फडतरे मिसळ सेंटर, कोल्हापूर – जमलं न्हाय राव!

कोल्हापुरी मिसळ म्हंटल कि कानातून धूर अन नाकातून पाणी यायलाच हवं, नाही का? पण फडतरेंची मिसळ खाल्ल्यावर आला तो फक्त घाम, ते देखील रांगेत उभे राहिल्यामुळे व एवढ्याशा जागेत बसावे लागल्यामुळे!

मागे एका मैत्रिणीच्या लग्नानिमित्त कोल्हापूरला जायचा योग आला. आता कोल्हापूरला जायचे म्हणजे देवीचे दर्शन, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी मटण (with पांढरा व तांबडा रस्सा) आणि कोल्हापुरी मिसळ आलंच! सर्वप्रथम देवीचे दर्शन घेतले आणि मग वळलो नाश्त्यातील माझ्या आवडत्या पदार्थाकडे – मिसळ पाव. एका मित्राने फडतरे मिसळ सेंटरचे   नाव  सुचविले. तेथे  पोहोचल्यावर  पाहतो  तर काय, लोकांची एक  भलीमोठी  रांगच  लागली  होती!  ते  पाहून  आमच्या  अपेक्षा  आणखीनच  वाढल्या.  बराच वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर एका बाकावर बसण्यासाठी जागा मिळाली. मिळालेल्या थोड्याशा जागेत kindly adjust  करून  बसलो.

लगेचच आमची मिसळ व त्यासोबत ब्रेडचे स्लाईस आले. मोठ्या आशेने पहिला घास घेतला अन   पहिले उदगार बाहेर पडले ते – जमलं न्हाय राव! मिसळ  तशी  चविष्ट  होती  पण  त्यात  कोल्हापुरीपण  नव्हते.  मग  फडतरे  मिसळ सेंटर व श्री. फडतरे  यांचा  एक  फोटो   घेऊन  बाहेर  पडलो. तेव्हा मला आठवली ती माझी आवडती बालगंधर्वच्या  कॅन्टीन  मधील  मिसळ  (Misal Pav at Balgandharva Ahaar Cafeteria).                                                              तुमची  सर्वात  आवडती  मिसळ  कोणती?

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s