Category Archives: Poems

तुझी आठवण

तुझ्या आठवणींना भेटून,

बसतो जेव्हा डोळे मिटून,

नकळत ओले होतात नयन,

जेव्हा येते मज तुझी आठवण.

 

तुझ्या आठवणींत जातो रमून,

मीच माझे भान हरपून.

अश्रू नकळत वाहत असतात,

जणू किती लोक पाहत असतात.

डोळ्यांसमोर येतो, तुझ्या आठवणींतील प्रत्येक क्षण,

जेव्हा येते मज तुझी आठवण.

 

तो हळवा शीतल वारा होता,

की तूच मला स्पर्शून गेलीस?

अश्रू आपोआपच सुकले,

की तूच त्यांना पुसून गेलीस?

निराश होऊन राहतं हे मन,

जेव्हा येते मज तुझी आठवण.

 

तुझ्या आठवणींत इतका रमतो,

की तुझ्या असण्याचा भास होतो.

पण डोळे उघडून जेव्हा पाहतो,

तो सूर्य मावळताना दिसतो. 

कोणासोबत वाटावे मी माझे एकटेपण,

जेव्हा येते मज तुझी आठवण?

भूला हुआ फ़साना

फिर कोई भूला हुआ फ़साना याद आया,

जो कभी ना बन सका, वोह अफसाना याद आया,

कहने को तो भूल चुके है उनको,

फिर भी उन्हें याद करने का बहाना याद आया|

 

उनके लिए लिखी हर ग़ज़ल याद आई,

उनके लिए गाया हर तराना याद आया,

कहने को तो भूल चुके है उनको,

फिर भी उन्हें याद करने का बहाना याद आया|

 

उनकी आँखों का वोह शर्माना याद आया,

उनके लबों का वोह मुस्कुराना याद आया,

कहने को तो भूल चुके है उनको,

फिर भी उन्हें याद करने का बहाना याद आया|

 

इस शायर को दफ्न कर चुके थे, उनकी यादों के साथ,

आज मुझे मैं ही दीवाना याद आया,

आज मुझे मैं ही दीवाना याद आया,

उन्हें याद करने का बहाना याद आया|